मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत आणणार अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली होती. त्यानर अभिनेते नाना पाटेकर यांनी एक ट्विट केले होते. त्यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवर म्हणाले की, “नाना पाटेकर यांनी कुठलीही टीका केली नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं, मी तुमचं अभिनंदन करतो. सरकारचं अभिनंदन करतो. या ट्विटमध्ये जे वाक्य वापरले ते कोणासाठी आणि कशासाठी वापरले ते ज्या लोकांनी हा देश लुटला त्याविरुद्ध कृती अपेक्षित असल्याचं ते म्हणाले होते. सरकारवर नानांनी टीका केली नाही. तुम्हाला अर्थ समजला नसेल तर त्यांना विचारू शकता, असे मुनगंटीवार म्हणाले.
काय होते नाना पाटेकर यांचे ट्विट?
सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा तलवार पाठोपाठ आता शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यावर नाना पाटेकर म्हणाले होते की "मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन...जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा....".