मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबध्द : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14-Sep-2023
Total Views |
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत मागे घेतले आहे. या सगळ्या घडामोडीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'X' पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले, ही समाधानाची बाब असल्याचे फडणवीस म्हणाले.
तसेच, मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो असूनते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. . सुप्रीम कोर्टात टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही, असे सांगतानाच सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.