मुंबई : टेलीकम्युनिकेशन्स कंसलटेंट्स इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. टीसीआयएलमधील विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे. टीसीआयएलकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, टीसीआयएल अंतर्गत अभियंता, पर्यवेक्षक, ड्राफ्टसमन, टेक्निकल असिस्टंट, डॉक्युमेंट कंट्रोलर या पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० सप्टेंबर २०२३ असणार आहे. सदर भरतीप्रक्रिया कुवैत ऑइल कंपनी (KOC) येथे दुय्यम आधारावर २ वर्षांकरिता विशेष मनुष्यबळ म्हणून करण्यात येणार आहे.