मुख्यमंत्री आल्यावरच उपोषण सोडणार: मनोज जरांगे

    13-Sep-2023
Total Views |
 
Manoj Jarange
 
 
मुंबई : मुख्यमंत्री आल्यावरच उपोषण सोडणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. तर मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जरांगेंना भेटण्यासाठी जालन्यात जाणार आहेत. जरांगेंचा आज उपोषणाचा १६वा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. आम्ही आरक्षण देतो, एक महिना द्या, असे सरकारने म्हटले होते. त्यातच आता मुख्यंमंत्री, उपमुख्यमंत्री जरांगेंची भेट घेणार आहेत.
 
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. दुपारी चार वाजता विमानतळावर पोहोचून अंतरवाली सराटी गावात जातील. त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचं उपोषण आज सुटणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि मंत्रिमंडळातील इतर काही सहकारी यावेळी अंतरवली सराटी गावात हजर राहण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.