मुंबई : "मराठी सांगभूमी समृद्ध आहे, परंतु तिच्या अभिव्यक्तीसाठी कलाकारांना जी जागा लागते ती मिळावी. या नाट्यगृहाच्या माध्यमातून अनेकांना आपली कला मांडता येईल." असे उद्गार अभिनेते परेश रावल यांनी काढले. संस्कृतीच्या संवर्धनाची दिशा नाटक, संगीत व अभिनयातून जाते तेव्हा त्यावर सरकारी वाचक कमीत कमी असावा असेही त्यांनी मत मांडले.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने टिळक रोडवर श्रीराम लागू रंगावकाश या थिएटरची स्थापना करण्यात आली. यावेळी उदघाटन परेश रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या समारोपाला, दीपा लागू, मोहन आगाशे असे दिग्गज कलाकार सुद्धा उपस्थित होते.