आजचा दिवस बैठकांचा; ठाकरे पवारांमध्ये ९० मिनिटे चर्चा, महायुतीच्याही बैठका

    12-Sep-2023
Total Views |

Thackeray
 
 
मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना आज (१२ सप्टें) महायुती सरकारसह विरोधी पक्षांनीही बैठकांचे आयोजन केले होते. महायुती सरकारची समन्वयक बैठक आणि शरद पवारांच्या सिलव्हर ओकवर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयेजन करण्यात आले होते. यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित होते.
 
महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडणार आहे. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रसाद लाड भाजपकडून उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, छगन भुजबळ, शिवसेनेकडून दादा भुसे, शंभुराज देसाई उपस्थित राहणार आहेत.
 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. तर, I.N.D.I.A. आघाडीच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीतल्या शरद पवारांच्या घरी होणार असून याच पार्श्वभुमीवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत आज पवारांच्या सिलव्हर ओकवर निवासस्थानी पोहोचले. यावेळी ठाकरे पवारांमध्ये ९० मि. चर्चा झाल्याचे समजते आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.