सौदी अरेबिया व भारतात डझनभर सामंजस्य करार संमत
नवी दिल्ली: G 20 च्या पार्श्वभूमीवर भारत व सौदी अरेबियात डझनभर सामंजस्य करार ( Memorandum of Understanding) झाल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.आयटी, कृषी, माहिती तंत्रज्ञान, फार्मा, पेट्रोकेमिकल, मानवी संसाधन या प्रमुख क्षेत्रात ही बोलणी झाल्याचे दिसून आले.
यातील खाजगी क्षेत्रातील कंपन्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, एच पी, व्ही एफ एस ग्लोबल, आयसीआयसीआय बँक यांनीही या करारात सहभाग नोंदवला. विशेषतः MoU हा ' इनव्हेसमेंट इंडिया ' सौदीच्या गुंतवणूक मंत्रालयात पण करार झाला आहे.
'खूप छान, भारत व सौदीत अनेक घोषणांच्या अनुषंगाने या कराराचा दोन्ही देशांना व जी २० देशांना फायदा होईल.दोन्ही देशांच्या उज्वल भविष्यासाठी आपण एकत्र काम करू ' असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आल सौद यांनी याप्रसंगी बोलताना केले.