मुंबई : राज्यातील विविध तब्बल ३४ जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केला होता. त्यानुसार, राज्यातील ३४ जिल्ह्यांतील तब्बल १९ हजारांहून अधिक रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त पदे ही नाशिक जिल्हा परिषदेतील असून १ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाशिककरांसाठी शासकीय नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
राज्यामध्ये सध्या महाभरती सुरु असून ही महाभरती जवळपास राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत १९ हजार ४६० पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील १०० टक्के आणि इतर विभागांतील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून त्यासाठीची नोंदणी सुरु झाली आहे. तर अर्ज दाखल करण्यासाठी २५ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.
परीक्षेच्या तारखा उमेदवारांना परिषदेच्या संकेतस्थळावरच कळतील आणि परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या ७ दिवस आधी मिळेल. तर ज्या उमेदवारांना नोकरी मिळेल त्यांना आपल्या प्राप्त पदानुसार १९,९०० ते १,१२,४०० इतके वेतन मंजूर झाले आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी अधिकृत बेवसाईट https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ यावर जाऊन अधिक माहिती घ्यावी.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये भरती साठी रिक्त असलेली पदे
ग्रामसेवक (कंत्राटी) - ५०,आरोग्य पर्यवेक्षक - ३, आरोग्य परिचारिका - ५९७, आरोग्य सेवक (पुरुष) - ८५, आरोग्य सेवक (पुरुष - हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी - १२६, औषध निर्माण अधिकारी - २०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १४, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - २, विस्तार अधिकारी - शिक्षण (वर्ग ३, श्रेणी २) - ८, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) - ३, पशुधन पर्यवेक्षक - २८, कनिष्ठ आरेखक - २, कनिष्ठ लेखा अधिकारी - १, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) - ५, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) - २२, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका - ४, कनिष्ठ यांत्रिकी - १, कनिष्ठ अभियंता (स्थापत्थे) - ३४, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - ३३, लघुलेखक (उच्च श्रेणी) - १, एकुण – १०३८ जागा रिक्त आहेत.