'रावरंभा' चित्रपटाचा विशेष शो

    24-May-2023
Total Views |
 
मुंबई : ढोल ताशांचा गजर आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईतील चित्रा सिनेमागृहात दिमाखात संपन्न झाला. दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित, अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाचा प्रीमियर प्रयोग झाला. येत्या शुक्रवारी २६ मे ला 'रावरंभा' चित्रपटगृहात दाखल होत आहे.
 

raorambha 
 
स्वराज्यावर चालून आलेलं बहलोलखान नावाचं संकट शिवरायांचे शिलेदार कसे परतवून लावतात, हे सांगतानाची राव आणि रंभाची ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा म्हणजे ‘रावरंभा’ चित्रपट.
 
अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून 'राव’ आणि रंभा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. यांच्यासोबत शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल,मयुरेश पेम, अश्विनी बागल, शशिकांत पवार, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाल मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, प्रशांत नलवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
 
सिद्धहस्त लेखक प्रताप गंगावणे यांच्या लेखणीतून ‘रावरंभा’ चित्रपट साकारला आहे. पटकथा आणि अंगावर काटे आणणारे जबरदस्त संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. बॉलीवूडच्या तोडीचे छायांकन संजय जाधव यांनी केले असून संकलन फैजल महाडिक यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत. विक्रम धाकतोडे आणि आकाश पेंढारकर यांनी चित्रपटाच्या मार्केटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
 
अॅक्शन सीन, सुमधुर संगीत, व्हीएफक्स अशा अनेक गोष्टी ‘रावरंभा’ चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘रावरंभा' च्या टीमने दाखवून दिले असून सोबत उत्तम प्रमोशन आणि मार्केटिंग या जोरावर ‘रावरंभा’ चित्रपट येत्या शुक्रवार पासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल यात शंका नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.