'माफी मागणाऱ्या भरत जाधव यांनी तिकिटाचे पैसे परत केले का?' - उदय सावंत

    24-May-2023
Total Views |

bharat 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी भरत जाधव याने रत्नागिरीत आपल्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाट्यगृहाची दुरावस्था बघून पुन्हा प्रयोग करणार नसल्याची घोषणा करत प्रेक्षकांची माफी मागितली. हा किस्सा खूप गाजला. त्यानंतर प्रथमच उद्योगमंत्री उदय सावंत यांनी यावर आपले मत मांडत प्रतिक्रिया दिलेली आहे. 'भरत जाधव यांनी माफी तर मागितली. पण तिकीटांपैकी काही पैसे तरी परत करण्याचे दाक्षिण्य दाखवले का?" असा रोकडा सवाल उदय सावन्त यांनी केला.
 
उदय सावंत पुढे म्हणाले, "मी इकडे येणार नाही, मी तिकडे येणार नाही, पण असं काही होत नाही आणि ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबणार नाही. सावरकर नाट्यगृहात कोणत्या त्रुटी असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील. संयोजकांनी तीन तासाचे डिझेल टाकल्यानंतर ते चार तास पुरूच शकत नाही. कार्यक्रम किती वेळ चालवायचा हा संयोजकांचा विषय आहे. ज्यावेळेला आपण खातू नाट्यगृहात शो करत होतो, त्या वेळेला तुम्हाला कुठेही जायची तयारी होती, अशा स्वरूपाचा एका नाट्यरसिकाचा लेख आपण वाचला. आता वि. दा. सावरकर नाट्यगृहात अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो. त्यावेळेला एसीचा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही, त्यामुळे आहे त्यापेक्षा उगाचच काहीतरी मोठे झाले आहे असं करून आविर्भाव आणत दाखवणं हे योग्य नाही."
 
आपापल्या कर्यचीमाहितीदेत उदय सावंतांनी सुधारणेची ग्वाही ही आहे. ते पुढे म्हणाले, "मीही सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे आपण या सगळ्या लोकांना अनेक वर्ष बघत आहे. भरत जाधव मला कॉल करून बोलू शकले असते. आठवड्याभरापूर्वी बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात भरत जाधव माझ्यासोबत होते. त्यासाठी त्यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती. पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे. परंतु या सगळ्याची दखल नक्की घेण्यात आली असून काही त्रुटी असल्यास त्या नक्कीच दूर केल्या जातील."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.