छ.शिवरायांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

    24-May-2023
Total Views |
BJP Yuva Morcha against inc rahul gandhi

नाशिक
: भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यी तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारा व्हिडीयो काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवरून प्रसारीत करण्यात आला. याची त्वरीत दखल घेवून महाराष्ट्र भाजपाने तो व्हिडीयो ब्लॉक करावा. सोशल माध्यमातून हटवावा, अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिल्यानंतर संबंधित व्हिडीओ काढला गेला नाही. या विरोधात भाजयुमो नाशिक महानगराच्यावतीने रविवार कारंजा येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारुन काँग्रेस पक्षाचा व राहुल गांधीचा निषेध करण्यात आला.

एकीकडे दि.६ जून रोजी ३५०वा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्याची तयारी सुरु असतांना काँग्रेस पक्षाने राहुल गांधीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून महाराष्ट्रातील तमान शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करत डोक्याला काळया पट्या बांधून नाशिक भाजपा युवा मोर्चाने जोरदार घोषणाबाजी करून याचा निषेध केला आहे. याप्रसंगी भाजपा युवा मेार्चा शहराध्यक्ष अमित घुगे, प्रदेश सचिव विजय बनछोडे, शहर सरचिटणीस निखीलेश गांगुर्डे, सागर शेलार, देवदत्त जोशी, वसंत उशीर, प्रतिक शुक्ल, राहुल कुलकर्णी, अनिल भालेराव, राकेश पाटील, महेश भांमरे, सुनिल वाघ, प्रविण भाटे, पवन उगले, ऋषिकेश शिरसाठ, हर्षद जाधव, विपुल सुराणा, विजय गायखे, विक्रांत गांगुर्डे, कुणाल निफाडकर, सनी गोसावी, अक्षय गांगुर्डे, विनोद येवलेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.