हिंदू धर्माबाबत प्रेरणादायी शिकवण - निक जोनास

    23-May-2023
Total Views |
nick priyanka 
 
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने गायक निक जोनास सोबत लग्न केल्यानंतर त्याला हिंदू धर्माविषयी माहात्म्य सांगितलं आहे. नुकत्याच जिओ च्या एका कार्यक्रमासाठी निक आणि प्रियंका मुंबईत आले होते. त्यावेळी निकने अनेक गोष्टी उघड केल्या.
 
निक म्हणाला, "प्रियांकासोबत, एका हिंदू स्त्रीसोबत लग्न केल्यानंतर मला हिंदू धर्मातील अनेक गोष्टींचे महत्व पटू लागले आहे. ही एक प्रेरणा दायी शिकवण आहे. आमची मुलगी मालती मेरी हिला आम्ही दोन्ही धर्माची शिकवण देणार आहोत. बायबल अनुसार आणि हिंदू धर्म तत्वानुसार दोन्ही." असे म्हणत तो पुढे म्हणाला, "माझं आणि ईश्वराचं गहिरं नातं आहे, हिंदू धर्मानुसार ईश्वर अनेक अवतार घेत असतो. ही संकल्पनाच मला प्रेरणा दायी वाटते."
 
यावेळी मुंबई दौऱ्या दरम्यान आपल्याला काय काय अनुभवलेले हे यावेळी निकने शेअर केले. आपल्याला सर्व लोक जीजू म्हणत होते असेही त्याने अभिमानाने सांगतले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.