नाट्यगृहाच्या मुद्दा ऐरणीवर; चारचौघींना फुटल्या जिव्हा

    22-May-2023
Total Views |


charchaughi 
 
मुंबई : अभिनेता भरत जाधव यांनी नुकतेच नाट्यगृहांतील दुरावस्थेवर आसूड ओढले आणि त्यानंतर प्रेक्षकांची माफी मागत पुन्हा रत्नागिरीत प्रयोग ठेवणार नसल्याची माफी मागितली. त्यानंतर, नाट्यगृहाच्या सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान जिगीषा निर्मित चारचौघी या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या नाट्यगृहाचे कौतुक करताना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडीओ केला आहे.
 
या व्हीओडीओ मध्ये ती म्हणते, "वाशीत प्रयोग असेल तेव्हा मला नेहमीच आवडत. सर्व सुविधांनी सुसज्ज असे नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. वाशीत दर्दी चचतेही आहेत, आज मी माईक क्वालिटी तपासण्यासाठी बाहेर आले तर मला व्याक्यूम क्लिनर घेऊन साफसफाई करणारे दिसतायत." यांनतर मुक्ताच्या लाईव्ह वरून टीम मधली सर्वांनी आपापली मते मांडली. टीम मेम्बर्स पैकी साउंड देणारे काका म्हणाले इतर नाट्यगृहात मच्छरे डास यांचे प्रमाण जास्त असते. त्याबरोबरच, कादंबरी कदम, रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, निनाद बेडेकर, पार्थ आणि राज यांनीही आपापली मते मांडली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.