'या' कारणामुळे रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही : भरत जाधव

नाट्यगृहाची दूरावस्थेमुळे भरत जाधव यांची नाराजी

    21-May-2023
Total Views |
bharat-jadhav-says-he-will-not-perform-natak-show-again-in-ratnagiri

रत्नागिरी
: अभिनेता भरत जाधव सध्या ' तू तू मी मी' या नाटकाचे राज्यात प्रयोग करत आहे. रत्नागिरीत दि.२० मे रोजी त्यांचा नाटकाचा प्रयोग होता. यावेळी नाट्यगृहातील AC बंद होता. तसेच पंखेदेखील नाट्यगृहात नव्हते.तसेच नाट्यगृहाची स्वतांची साऊंड सिस्टम नसल्याने कलाकारांना त्रास सहन करावा लागला. प्रेक्षकांना देखील प्रचंड उकाड्याच हे नाटक पाहावे लागल्याने भरत जाधव संतापले आणि या प्रयोगानंतर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही , असे म्हणाले.
 
भरत जाधव यांनी नाटकाच्या प्रयोगानंतर जाहीर केले की, नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही. मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. 'एससी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पाहा', अशी कळकळीची विनंती भरत यांनी प्रेक्षकांना केली. त्यांनी असेही म्हटले की अशी परिस्थिती असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता? शिवाय 'रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही', असंही ते त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.