मी महाराष्ट्राची संस्कृतीच जपते! - गौतमी पाटील

    20-May-2023
Total Views |

gautami patil 
 
मुंबई : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्यवरच टीका होत असते. अशातच गौतमी महाराष्ट्राचा बिहार करते आहे अशी टीका छोटा पुढारी महाराष्ट्रायांनी गौतमीवर केली आहे. टीकेस प्रतिउत्तर म्हणून गौतमीने चिडून उत्तर दिले आहे.
 
गौतमी म्हणाली, "मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसते का? इतर महिला नाही दिसत? माझा कार्यक्रम पहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केला आहे का दादा?" असा रोकडा सवाल गौतमीने उपस्थित केला. सांगोल्यातील घेरडी गावात रासप नेत्यांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गौतमीने आपले म्हणणे मांडले.
 
घनश्याम दराडे म्हणाला होता, "बाई तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करू नका. ते खपवून घेतले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे बाई वाचवणारे होते. बाई नाचवणारे नव्हते. हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. छोटा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो कि वाकडे तिकडे चाले करून डान्स करू नका. तसे केल्यास लहान मुलांवर काय संस्कार होतील? वाकडे तिकडे अंग हलवल्याने फेमस होतात असे लहान मुलांना वाटले तर पुढे तेही तसेच वागतील."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.