गद्दार, ५० खोके हे शब्द आता जनतेलाही पटले आहे: अजित पवार

    20-May-2023
Total Views |
 
ajit pawar
 
 
कोल्हापुर : गद्दार, ५० खोके हे शब्द आता जनतेलाही पटले आहेत. असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. आर्थिक शिस्त बिघडली आहे त्याला जबाबदार कोण? तुम्ही काय काय केल हे जनतेला माहित आहे. महाविकास काळातील विकास कामांवरची बंदी हायकोर्टाने उठवली तरी हे सुप्रीम कोर्टात गेले काय कारण आहे?जनता सगळे दाखवून देत असते. कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिलं. असं अजित पवार यावेळी म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले, "आमच्या काळात आम्ही काय त्यांची काम बंद केली नव्हती. ११ महिन्यांनंतरही महागाई गेली नाही, लोकसभेत ताकद दाखवा. मुख्यमंत्री शिंदे MPSC आयोगाला निवडणूक आयोग बोलतात. शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकार गप्पच आहे. सरकारनं सर्वसामान्यांसाठी काहीच केलं नाही." असं ही अजित पवार म्हणाले.
 
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, आता समविचार पक्षांनी एकत्र यावं लागणार आहे. कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरची मतं घटली आहेत. भाजपची मतं आहेत तेवढीच आहेत. थोडाफार फरक पडला असेल. परंतु जेडीयूची मतं घटून काँग्रेसकडे गेली. त्यामुळे त्यांना यश मिळाल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.