जनप्रक्षोभ मोर्चात सहभागी युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांच निधन!
06-Apr-2023
Total Views | 240
1
ठाणे : रोशनी शिंदे या शिवसेना पदाधिकारी महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ ठाण्यात जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे या सुद्धा मोर्चात जोरदार घोषणा देत होत्या. मात्र, घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि रात्री त्यांचे निधन झाल्याचे समजते आहे.
दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 30 व्या वर्षी दुर्गा भोसले यांच निधन झालं आहे. त्यांच्या मागे पती, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. युवासेनेच्या कर्तृत्ववान महिला अशी दुर्गा भोसले यांची ओळख होती. दुर्गा भोसले या काल ठाण्यातील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनप्रक्षोभ मोर्चात देखील सहभागी झाल्या होत्या. मोर्चा दरम्यान उस्फुर्तपणे घोषणा देत त्या सहकारी शिवसैनिकांसोबत चालत होत्या.