मुंबई : येत्या निवडणूकांना सामोरे जायचे आहे. पद मिळेल, आमदारकी-खासदारकी मिळेल, नगरसेवकाचे तिकीट मिळेल, याची अपेक्षा न करता कामाला लागा. देशात लोकशाही टीकवण्यासाठी सर्वासामान्य माणसांच्या लढाईसाठी कामाला लागा, कसली अपेक्षा करू नका, अपेक्षा करणारे बिकाऊ सोडून गेले आहेत, असे आवाहन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमोर केले आहे.
पदाची अपेक्षा न करता महाराष्ट्रभरात जोमाने लढा. काहीही झालं तरीही मिंदे गटाशी युती करू नका, पदाच्या लालसेपोटील त्यांच्या सोबत जाऊ नका, त्यांच्या सोबत गेला नाहीत आणि पराभूत झाला तरीही काही हरकत नाही. मात्र, त्यांच्यात सामील झालात की लोकशाही संपलीच म्हणून समजा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणतात की, "छत्रपती शिवजी महाराज आपली परीक्षा पाहत आहेत, आपण ज्यांचे नाव घेतो त्यांनी आपल्या मनगटातील ताकद आजमावण्यासाठी आपली परीक्षा घेतली आहे. दिल्लीतील सरकारांची तुलना उद्धव ठाकरेंनी अफझल खानाशी केली. एकतर तुरुंगात किंवा भाजपात, अशी टीका त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल चढवला. मी घरी बसून जे कमावलं ते तुम्हाला सुरतला जाऊनही करता आलं नाही," असा टोला त्यांनी लगावला आहे.