व्हायरल व्हिडिओवर सुर्वेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

    15-Mar-2023
Total Views |
 
Prakash Surve
 
मुंबई : शिवसेना पदाधिकारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओवर राजकीय वातावरण तापलेले असताना म्हात्रे यांनी माध्यमांसमोर येऊन भुमिका स्पष्ट केली होती. मात्र, प्रकाश सुर्वे यांच्या मौनाचे कारण समजले नव्हते. अशातच, सुर्वे यांनी आपली भुमिका मांडली आहे.
 
आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये आपली तब्येत ठीक नसल्याने आपण बोललो नाही, असं सुर्वे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड इस्पीतळामध्ये दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चुकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्या जात आहे. त्यामुळे मी हे विस्तृत निवेदन देत आहे."
 
"एकनाथ शिंदेंच्या कामाच्या धडाक्यामुळे राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीयो मोर्फ करणे, खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करित आहेत." असा आरोप त्यांनी केला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.