मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण नाना शंकरशेट टर्मिनस करा

पंतप्रधानांच्या अनुमतीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक

    15-Mar-2023
Total Views |

Nana Shankarshet Terminus
 
 
ठाणे : भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे.त्यानुसार, प्राप्त निवेदनावर तातडीने शेरा मारून पंतप्रधानांच्या अनुमतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी दिली.
 
जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट हे मुळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील असून ते ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत तसेच त्यांचं काही काळ वास्तव्य व येणं जाणं घोडबंदर रोड गावामध्ये होते, तिथे त्यांचा जुना वाडा आणि त्यांनी स्थापन केलेले शंकराचे मंदिर देखील आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या या सुपुत्राचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे. तसेच, राज्य सरकार व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. असा शेरा मारला आहे.दरम्यान, राज्यात धडाडीचे निर्णय घेणाऱ्या फडणवीस - शिंदे सरकारने या नामांतरा विषयी देशाच्या पंतप्रधानांकडे पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे.
 
अनेक वर्षे पाठपुरावा सुरुच
 
मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण नाना शंकरशेट टर्मिनस करण्यासाठी दैवज्ञ समाज तसेच नाना शंकरशेट प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. राज्य शासनाने दि. २० मार्च २०२० रोजी नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन रेल्वे उपसंचालकांना नामकरण करण्यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही रेल्वे राज्यमंत्री यांच्या कार्यालयाने दिले होते.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.