संघाचे जेष्ठ स्वयंसेवक जयवंत (दादा) वाडेकर यांचे निधन

    15-Mar-2023
Total Views | 351
 
Jaywant Harishchandra Wadekar
 
वाडा : तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक जयवंत हरिश्चंद्र वाडेकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी (ता.१४) रोजी निधन झाले. जयवंत वाडेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्ह्याचे माजी संचालक, पंचायत समीती सदस्य, पालघर जिल्हा भाजपचे प्रसिद्धी प्रमुख अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.

तसेच ते यशस्वी उद्योजक, स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक व आदर्श कुटुंब प्रमुख होते. असे समाजाभिमुख अयुष्य जगणाऱ्या  वाडेकर यांच्या जाण्याने तालुक्यात शोककळा पसरली असून त्यांच्या अंत्ययात्रेस विविध पक्षातील राजकीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
 
  
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121