मुंबई : महाराष्ट्रातील हौशी कलाकारांना नव्या नाट्यकृती सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्यात ७५ ठिकाणी नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६२व्या हौशी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरीला सोमवार दिनांक २१ नोव्हेंबरपासून भरत नाट्य मंदिरात सुरुवात झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी स्पर्धकांना ऑनलाइन माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.
“सांस्कृतिक कार्य संचालनाच्या अखत्यारित मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर हे एकच नाट्यगृह आहे. या पार्श्वभूमीवर कलाकारांसाठी अधिक रंगमंच उपलब्ध होण्यासाठी राज्यभरात संचालनालयातर्फे तालुका स्तरावर ७५ नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत. तसेच, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाट्यगृहांचे देखील नूतनीकरण पुढच्या दोन वर्षांत करण्यात येईल, अशी माहिती देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.