'झिम्मा'मध्ये माझी कास्टिंग सर्वात शेवटी झाली पण...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितला किस्सा

    20-Nov-2023
Total Views |

suchitra bandekar 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी २०२१ मध्ये 'झिम्मा' हा महिलांच्या आनंदाची वेगळी व्याख्या ठरणारा सुपरहिट चित्रपट भेटीला आणला होता. आता पुन्हा एकदा सात बायका एका टुर गाईडसोबत नव्या प्रवासाला निघणार आहेत. 'झिम्मा २' लवकरच प्रदर्शित होणार असून पुन्हा एकदा सिद्धार्थ चांदेकर सोबत सर्व बायका धमाल-मस्ती करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर हिचे फारच सुंदर पात्र असून तिच्या निवडीविषयी महाएमटीबीशी बोलताना सुचित्राने खास किस्सा सांगितला आहे.
 
काय म्हणाली सुचित्रा बांदेकर?
 
“ ‘झिम्मा १’ या चित्रपटात सर्वात शेवटी माझं कास्टिंग झालं. कारण याआधी जी अभिनेत्री मी साकारलेलं पात्र साकारणार होती तिला ऐनवेळी दुसरं काम आल्यामुळे हा चित्रपट करु नको अशा संभ्रमात ती होती. त्यानंतर क्षितीला आता कुणाला या भूमिकेसाठी घ्यायचं असा प्रश्न पडला. मी परेशात असताना अचानक क्षितीचा फोन आला. तिने मला सांगितलं की मी एक चित्रपट करत आहे तर तु भूमिका करशील का? मी म्हटलं हो.. मी परदेशात आहे लवकरच मुंबईत आले की तुला भेटते. आणि मग असा माझ्या ‘झिम्मा १’ चित्रपटासोबतचा प्रवास सुरु झाला. आणि त्यानंतर ‘झिम्मा २’ साठी देखील विचारल्यानंतर माझा पहिल्या भागातला अभिनय उत्तम झाल्याचे समाधान देखील झाले”.
 
दरम्यान, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे यांच्या भूमिका आहेत. ‘झिम्मा २’ २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.