प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा अशा आशयनिर्मितीची गरज - हेमंत ढोमे

    18-Nov-2023
Total Views |

hemant dhome 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : करोनानंतर मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून नेणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'. सात बायकांचा परदेशातचा प्रवास आणि त्यांना सोबत नेणारा त्यांचा टुर गाईड आणि तेथील धमाल मस्ती प्रेक्षकांना मनोरंजित करणारी आणि जीवनाचे कारी सार सांगणारी देखील होती. २०२१ नंतर आता पुन्हा एकदा ७ बायका परदेशात जाणार असून यावेळी इंदु डार्लिंग अर्थात अभिनेत्री सुहास जोशी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांचे रियुनियन होणार आहे. नुकताच 'झिम्मा २' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाएमटीबीशी संवाद साधला. यात त्यांनी प्रेक्षकांच्या आवडी-निवडीवर आणि मराठी चित्रपटांच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले.
 
प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा अशा आशयनिर्मितीची गरज  
 
मराठी चित्रपट कायमच बजेटमुळे मागे राहतात अशी तक्रार केली जाते. याबद्दल बोलताना हेमंत म्हणाले, “आपल्याकडे वर्षाला १२५ चित्रपट सेन्सॉर केले जातात. त्या १२५ चित्रपटांपैकी यश हे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत चित्रपटांना मिळते. तर काही वेळा दिग्दर्शक, निर्माते मार्केटिंग करण्यात, प्रसिद्धी देण्यात किंवा प्रेक्षकांना जे पाहायचे आहे ते देण्यात कमी पडतो आणि त्याचमुळे आर्थिक दरी मराठी चित्रपटांच्या बाबतीत तयार होते. तर दुसरीकडे ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’, सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० कोटींच्या पुढे कमाई करतात. यातुन एक गोष्टी नक्कीच कळते की मराठी प्रेक्षक आहेत, ते चित्रपट पाहतात आणि उत्तम आशय असलेल्या चित्रपटांना ते योग्य प्रतिसाद आणि दाद देतात. महत्वाची बाब म्हणजे प्रेक्षकांना ओटीटी, टीव्ही आणि चित्रपटगृहांत काय काय बघायचे हे कळून चुकल आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पाहावा असा आशय निर्माण करण्याची जबाबदारी आम्हा सर्व कलाकारांवर आहे”.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.