स्पृश्य आणि अस्पृश्यांसहित केलेले रत्नागिरीतील पहिले सहभोजन आणि त्याविषयीचा सावरकरांचा निबंध

    16-Nov-2023
Total Views |
 
swatantryaveer savarkar
 
१९३० साली याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नाभगिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले. पतित पावन मंदिर ही या प्रकट भोजनाची रत्नागिरीत अजूनही उभी असलेली निशाणी आहे. स्पृश्य आणि अस्पृश्य वेगळे नाहीत हे सांगण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेक निबंध लिहिले. 'आजच्या स्पृश्यांचे आणि अस्पृश्यांचे पूर्वज बहुशः एकच होते' अशा शीर्षकाचा त्यांचा निबंध चांगलाच गाजला. आजच्या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या लेखनातील हा निबंध देत आहोत.
 
सावरकर लिहितात, 
अंतर अर्थातच ही हिंदुत्वाची मत्ता जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्य हिंदूंचीही पितृपरंपरागत स्वायत्त संपत्ती आहे. ती तुमच्या आणि आमच्या पूर्वजानी ते एकत्र होते तेव्हा आणि ते पुढे गावांतल्या गावांत स्पृश्यास्पृश्यादिक वादांनी विभक्त झाले तरीही, समाईक श्रमांनी मिळविली आहे, समाईक शौर्याने संरक्षली आहे. तीवर जितका स्पृश्यांचा तितकाच अस्पृश्यांचाही वारसा आहे! मग तुम्ही असे कसे विचारता की, "ह्या हिंदुत्वावर आमचा अधिकार आहे. की नाही? हिंदुधर्म आमचा आहे की नाही ?"
ह्या प्रश्नात तुम्ही तुम्हांसच नकळत हे गृहीत धरता आहात की हिंदुत्व ही जशी काही एकट्या स्पृश्यांचीच मत्ता आहे! तुम्ही होऊन तुमचा अधिकार असा सोडून कसा देता ? एखाद्या राज्याचे दोन वारस असले आणि जर त्या वारसांतील एका वारसाने दुसऱ्यांस हीन स्थितीत ठेवले, तर त्या दलित वारसाने छलकाच्या त्रासास कंटाळून त्या राज्यासच सोडून देणे आणि दुसऱ्याच्या परशत्रूच्या दाराशी तुकडे मोडीत पडणे हे श्रेयस्कर आणि वीरवृत्तीस शोभणारे आहे का? त्या वारसाने सांगितले की तू राज्याबाहेर चालता हो तरी न जाता, त्याला न जुमानता त्या राज्यातील आपले न्याय्य स्वामित्व गाजविणे हे खऱ्या वीरवृत्तीचे लक्षण आहे!
 
तथाकथित अस्पृश्य बंधू हो, तुम्ही या हिंदुत्वाचा सनातन आणि पूर्वजार्जित साम्राज्यावर आपला अधिकार सांगा - दारापुढील भिकाऱ्यासारखे 'भिक्षा द्या, नाही तर चाललो दुसऱ्याच्या दारी' असे कार्पण्य प्रदर्शित करू नका. घराच्या धन्यासारखे घरात बरोबरीने उभे रहा. तुमच्या स्पृश्य बंधूंनी जरी म्हटले, "तू हीन आहेस हे हिंदुत्वाचे सांस्कृतिक महान राज्य माझे एकट्याने आहे, बाहेर जा" तर त्यांनाच उलट सांगा "ते एकट्या तुझ्या बापाने संपादित नाही! ते संपादण्यास आणि रक्षिण्यास सहस्रका मागून सहस्रके माझेही पूर्व झटत आलेले आहेत; मी बाहेर जात नाही. मला बाहेर जा असे तू कोण? ह्या आपल्या समाईक सत्तेचा आजवर बहुतेक उपभोग : आता मी तो तुला तसा अन्यायाने घेऊ देणार नाही!" म्हणामारा घेतलाम तू हिंदू धर्म माझा आहे, तो सोडण्यास सांगणारा तू कोण? असे उलट तुम्हीच स्पृश्यांस म्हटले पाहिजे. हिंदुधर्मात राहू देणारे किंवा न देणारे हे स्पृश्य लोक काय ते अधिकारी आहेत, अशी दरिद्री भावना आमच्या सोडून, अस्पृश्य बघूनी कधीही करून घेऊ नये आणि ती दरिद्री भावना व्यक्त करणारी 'आम्हांस शिवा; नाही तर आम्ही दुसरे घर पाहतो' अशी अत्यंत भिकारडी आणि नेभळ्या कुलकलंकासारखी वाक्ये उच्चारून आपल्याच पूर्वजांच्या त्यांच्या शत्रूसच पूर्वज समजण्याचा भ्याडपणा कधीही करू नये. कारण हिंदुत्वावरचा अधिकार सोडणे म्हणजे चोखामेळ्याच्या दैवतास मुकणे होय, सजन कसाई, रोहिदास चांभार, रामानंदाने स्थापिलेले त्यांचे अनेक डोम, माग इत्यादि जातीतील संतशिष्य ह्या सर्वांनी, अस्पृश्यांनो, ह्या तुमच्या अगदी प्रत्यक्ष पूर्वजांनी, उपार्जन केलेली सत्ता भित्रेपणाने सोडून पळून जाणे होय.
 
हिंदुत्व तुमच्या हजारो पिढ्यांनी प्राणापलीकडे - हे अस्पृश्यतेचे हाल सोसून देखील - जतन केले; ते हिंदुत्व धिक्कारून आणि त्या तुमच्याच महार, मांग प्रभृति सोमवंशी कुलांतील शतसहस्र पूर्वजांस मूर्खात काढून आपल्या बापाचे नांव बदलणे होय ! मग तुम्हांस चोखामेळा आमचा, रोहिदास आमचा, तिरुवल्लुवर आमचा, अजिंठा आमचा, काशी आमची, पंढरी आमची, कालिदास आमचा, ही हिंदुसंस्कृती आमची म्हणून अधिकार सांगता येणार नाही. जे तुमचे स्वतःचे वाडवडील हिंदू म्हणून नांदले त्यांना 'काफर' म्हणावे लागेल. तर आता पुन्हा अशी अमंगल भाषा तुमच्या स्वतःच्या जातीय अभिमानासाठीच बोलू नका. एका भावाने दुसऱ्यास छळले तर त्या दुसऱ्याने पहिल्याशी झुंजून आपले न्याय्य स्वत्व मिळवावे, का त्या भावावरचा राग काढण्यासाठी आपल्या बापासच बाप म्हणणे सोडून देऊन श्राद्धाचे दिवशी कोण्या दुसऱ्याचा आणि त्यातही ज्या दुसऱ्याशी आपले समाईक वाडवडील सारखे लढत आले अशा पराप नामोच्चार करावा ? एतदर्थ है धर्म बंधूनो, ही नीच भावना देऊ नका. अशी स्वधर्मत्यागाची भावना ज्याच्या मनारा उदय पावतो मात्र अस्पृश्य होय! त्याने त्वरित पश्चात्तापाचे प्रायश्चित घ्यावे. अशा वृतीने जरी मुसलमानाच्या दाराशी तुम्ही गेलात, तरी तुम्हांस तुकडेच मोडावे लागतील, त्यांच्यातील हसन निजामीने देखील आपल्या 'भयसूचक घंटे' (the Aarmbell- Booklet) मध्ये स्पष्ट सांगितले आहे की, "उच्च नि कुलीन मुसलमानांनी हिंदू भंगी, महार, इत्यादि जे लोक मुसलमान होतील त्यांच्याशी बेटी व्यवहारादिक संव्यवहार करावा असे मी मुळीच म्हणत नाही!"
 
मुसलमान झालेल्या महारादिकांचे पाणी निमाजाचे वेळी न घेणारे कित्येक मुसलमानी आम्ही स्वतः पाहिले आहेत. मागे बाटलेल्या अस्पृश्यांच्या अनेक जाती मुसलमानी। समाजात अजूनही जशाच्या तशा दूर ठेवलेल्या आहेत. ख्रिस्त्यांमध्ये तर त्रावणकोरास स्पृश्य ख्रिश्चन आणि अस्पृश्य ख्रिश्चन ह्यांचे दंगे वारंवार होतात हे विश्रुतच आहे. तेव्हा मुसलमान होऊ म्हणजे मोठेसे राज्य मिळणार आहे. असे थोडेच आहे ! परंतु तसे ते राज्य मिळते तरीही तेवढ्यासाठी तुमच्याच हजारो पूर्वजांच्या संस्कृती आणि तत्त्वज्ञानास आणि धर्मास आणि समाजास अंतरून जन्मदेत्या आईस आणि बापास सोडून, परशत्रूच्या पायी शरण रिघणे ही अत्यंत नीच प्रवृत्ती होय. अशा नीच प्रवृत्तीस आमचे अस्पृश्य धर्मबंधू आजवर बळी पडले नाहीत एवढा अमानुष छळ सोशीत पिढी पिढी मरणी मेले पण बळी पडले नाहीत. त्यांनी हिंदुत्वाच्या पूर्वजार्जित राष्ट्राचा विश्वासघात केला नाही. हे जितके त्यांचा तसा छळ करणाऱ्या स्पृश्यांना लज्जास्पद आहे तितकेच त्या अस्पृश्यांना भूषणावह आहे.
 
हिंदुधर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही आपल्या रक्ताने धुवून काढू. ही डॉ. आंबेडकरांची प्रतिज्ञा खऱ्या हिंदूस शोभण्यासारखी आहे. म्हणूनच त्यांच्या सत्याग्रहासही आम्ही न्याय्यच समजतो. पण त्याबरोबरच अत्यंत प्रेमान पण चिंतामग्न मनाने धोक्याची सूचनाही देतो की, 'हिंदुधर्म नाही ते सांगा' असे आत्मघातकी प्रश्न करून 'नाही तर आम्ही हिंदुत्व सोड अशी अभद्र आणि लाजीरवाणी वाक्ये उच्चारण्याने तत्त्वत्तः जितका नाश होणार आहे. तितकाच व्यवहारालाही होणार आहे. ती एक युक्ती म्हणून योजणे देखील लज्जास्पद आहे. कारण सख्ख्या पण दुष्ट भावाला भिवविण्याकरिताच का तुझ्या बापाला मी आजपासून माझा बापच म्हणणार नाही हा धाक घालणे जितके स्वतःसच लाजिरवाणे आहे, तितकेच स्पृश्यांस धाक दाखविण्यासाठी तुमच्याही पितृपरंपरेने पूजिलेल्या हिंदुत्वाचे तोंडावरच थुंकणे हे अत्यंत निंद्य आणि तुमच्याच आत्म्यास कलंक लावणारे आहे. होईना, पण स्पृश्यही होईन आणि हिंदूही राहीन ही प्रतिज्ञा करा. हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती - हिंदुत्व एकट्या स्पृश्यांच्या बापाचे नाही; ती दोघांच्याही बापाची समाईक मिळकत आहे. ती सोडून जाऊ का म्हणून स्पृश्यांसच काय विचारता? ते का तिचे धनी आणि तुम्ही का चोर आहा आणि जे पापी आणि निर्दय स्पृश्य तुमचे लाखो लोक बाटून गेले, तरी अजून अस्पृश्यता काढण्यास मान्य होत नाहीत ते तुम्ही आणखी काही लाख निघून गेलेत तरी थोडेच घाबरणार आहेत? यासाठी अशी अमंगळ भावना जितकी स्वतःस लज्जास्पद तितकीच परिणाम विफल असल्याने आमच्या अस्पृश्य बंधूंनी तिच्याशी वरवर देखील आंगलट करण्याचे पातक करू नये अशी आमची कळकळीची त्यांस विनंती आहे.
 
संदर्भ - जातीभेदोच्छेदक निबंध 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.