मुंबई : सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांचे 'किमयागार कार्व्हर' हे लहान मुलांसाठी लिहिलेले पुस्तक प्रथमच प्रकाशित होत आई. दि. १९ नोव्हेम्बर रोजी सकाळी १० वाजता मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, टिळक रोड येथे पुण्यात हा प्रकाशन सोहळा आहे. यावेळी लेखिका वीणा गव्हाणकर तसेच चित्रकार माधुरी पुरंदरे बालवाचकांशी संवाद साधणार आहेत.
एक होता कार्व्हर हे पुस्तक आणि जॉर्ज वॊशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र १९८१ प्रथम मध्ये प्रसिद्ध झाले. लहान मुलांसाठीलिहिलेले ही पुस्तक मात्र थोरामोठ्यांनीही डोक्यावर घेतले. वीणाताईंना या पुस्तकाने घराघरात बुकशेल्फ मध्ये पोहोचवले. आज ४२ वर्षानंतर ए पुस्तक पुन्हा एकदा नव्या रूपात प्रकाशित होतंय. कार्व्हरांच्या वाचकांची ही तिसरी पिढी असूनही या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. तेव्हा हे पुस्तक लहान मुलांसाठी नव्या रूपात प्रकाशित करायचे वीणा यांनी ठरवले. या नव्या पुस्तकाचे नाव 'किमयागार कार्व्हर' असे ठेवले आहे. राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकातील सर्व चित्रे माधुरी पुरंदरे यांनी रेखाटलेली आहेत.
-------
खरं तर मी १९७९साली मी मुलांसाठीच कार्व्हर चरित्र लिहिलं होतं..पण तुम्ही प्रौढांनीच त्याचा ताबा घेतलात..म्हणून मग आता नव्यानं मुलांसाठी "कार्व्हर "लिहून सादर करतेय.ते आता लवकरच प्रकाशित होतंय.कार्व्हरवाचकांची तिसरी पिढी या नव्यानं लिहिलेल्या कार्व्हरचं स्वागत करीलच मात्र तिच्या हाती ते पोहोचवण्याची कामगिरी तुम्हां मोठ्यांवर सोपवतेय.धन्यवाद.
- वीणा गवाणकर (लेखिका)