राऊत अडचणीत? जन्मतारखेच्या दोन नोंदी! निवडणूक शपथपत्रात घोळ!

    15-Nov-2023
Total Views |
Nitesh Rane on sanjay raut

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जन्मतारखेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. उबाठा गटाच्या लोकांकडून सांगितल्याप्रमाणे संजय राऊतांचा वाढदिवस हा आज दि. १५ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण त्यांची नेमकी जन्मतारीख कोणती यावरून नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.

नितेश राणे म्हणाले, उबाठा गटात उद्धव ठाकरे यांच्यासकट सगळेच ४२० आणि सोंगाडे भरलेत. त्यात एक चिपळूनचा सोंगाड्या आणि दुसरा भांडुपचा देवानंद. त्यामुळे काही लोक जन्मजात सोंगाड्या असतात. त्यामुळे संजय राऊत यांनी सांगावे की, २००४ ते २०१६ पर्यत तुमच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या शपथपत्रात तुमचा वाढदिवस १५ एप्रिल १९६१ ला आहे. आणि आता २०१६ ते २०२८ पर्यत तुम्ही जे शपथपत्र दिले आहे. त्यात तुमचा वाढदिवस १५ नोव्हेंबर १९६१ ला ला आहे. मग राऊतांनी नेमंकी जन्मतारीख का बदलली. ह्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण मिळालं पाहिजे. कारण नेमंक तुम्हाला शुभेच्छा १५ एप्रिलला द्याच्या की १५ नोव्हेंबरला द्याच्या. याबद्दल आजच्या दिवशी तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्ञानात भर टाका, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर केली आहे. या जन्मतारखेच्या दोन नोंदींमुळे आता संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.