...म्हणून पाचवी कसोटी रद्द केली : सौरव गांगुली

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने टीकाकारांना दिले उत्तर

    दिनांक  13-Sep-2021 20:51:43
|

BCCI_1  H x W:
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणारा पाचवा मँचेस्टर कसोटी सामना रद्द करण्यात आला. यानंतर इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआय आणि भारतीय संघावर टीका करण्यात आली. आयपीएल २०२१मुळे भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. यावर आता सौरव गांगुलीने स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाच्या भितीमुळेच हा सामना रद्द करावा लागला, असे त्याने स्पष्ट केले.
 
 
टेलिग्राफने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीने सांगितले आहे की, "खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. परंतु, तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. फिजिओ योगेश पारमार खेळाडूंच्या संपर्कात आले होते. त्यांनी खेळाडूंचा मसाजदेखील केला होता. यामुळे खेळाडूंना कोरोनाची भिती वाटत होती. अशा परिस्थितीत बायो बबलमध्ये राहणे सोपे नाही. खेळाडूंच्या भावनाचा आदर केला पाहिजे."
 
 
पुढे आयपीएलवरून झालेल्या टीकेवर उत्तर देत तो म्हणाला की, "सामना रद्द करण्याचा संबंध आयपीएलशी नाही. बीसीसीआय कधीही बेजबाबदार बोर्ड राहिलेला नाही." याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने, 'आयपीएल 2021 पूर्वी पॉझिटिव्ह होण्याची भीती भारतीय खेळाडूंना होती' असा गंभीर आरोप केला होता. इंग्लंडच्या काही माजी क्रिकेटपटूंनीदेखील हा आरोप केला. यावर सौरव गांगुलीने पूर्णविराम लावला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.