मालाड इमारत दुर्घटनेवर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021
Total Views |

malad pmo_1  H



नवी दिल्ली :
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर मालाड पश्चिममधल्या इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या घटनेवर शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, "मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो." असेही त म्हणाले.

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळले. त्यामुळे ११ जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला एक दुमजली घर कोसळ्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले.

हा परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहे. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना रात्री ११च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात ७ जण राहत होते. त्यातील ५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@