जीगरबाज क्रोबा कमांडो; नक्षलवाद्यांचा ताब्यातील जवानाचा फोटो आला समोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2021
Total Views |
naxal_1  H x W:

रायपूर - छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यामधून नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या जवानाचे छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रामध्ये अपहरण झालेले जवान कमांडो राकेश्वर सिंह मनहास यांच्या यांच्या चेहऱ्यावर भितीचा लवलेशही दिसत नाही आहे. दरम्यान सिंह यांच्या पत्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आपला नवरी घरी सुखरुप परतावा म्हणून विनंती केली आहे.
 
 
 
छत्तीसगडमधील बस्तरच्या बीजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २४ जवान शहीद झाले. बीजापूरच्या तर्रेम भागातील जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास ७०० जवानांना घेरले होते. चार तास ही चकमक चालली. या चकमकीत ९ नक्षलवादीही ठार झाले. तर जवळपास ३२ जवान जखमी झाले. जोना गडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर शुक्रवारी रात्री CRPFचे कोब्रा कमांडो, CRPF बस्तरिया बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती. पण नक्षलवाद्यांनी ७०० जवानांना घेरत तीन बाजूंनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. यात २४ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी जवानांची दोन डझनहून अधिक शस्त्र लुटली. घटनास्थळी १८० नक्षलवाद्यांशिवाय कोंटा एरिया कमेटी, पामेड एरिया कमेटी, जगरगुंडा एरिटा कमेटी आणि साबागुडा एरिया कमेटीचे जवळपास २५० नक्षलवादीही होते.
 
 
 
या हल्यामधून कोब्रा कमांडो राकेश्वर सिंह मनहास बेपत्ता झाले होते. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराकडे हे कोब्रा कमांडो जवान सुरक्षित असल्याचा संदेश पाठवला होता. त्यानंतर आज (बुधवारी) नक्षलवाद्यांनी राजेश्वर सिंह यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये, ते एका नारळाच्या झाडाच्या पानांनी तयार केलेल्या झोपडीत बसल्याचे दिसून येत आहेत. सीआरपीएफकडून या जवानाच्या फोटोची खात्री करण्यात आली आहे. फोटोमध्ये सिंह यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाही भारतीय सैन्यातील कमांडो राकेश्वर सिंह यांचा निडरपणा या फोटोतून स्पष्ट दिसून येते.

@@AUTHORINFO_V1@@