करिष्माला धमक्या येत होत्या तेव्हा कुठे होता? राऊतांना सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020
Total Views |
Sanjay Raut_1  
 
 
 
 
मुंबई : कंगना रणौतला शिवसेनेच्या मर्दानी बघून घेतील, असा धमकीवजा इशारा देणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना नेटीझन्सनी प्रश्न विचारला आहे. ज्यावेळी करिष्मा भोसले या मुलीने मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी तिला धमक्या येत होत्या, वारंवार मुंबई सोडून जा, अशा प्रकारच्या धमक्या येत होत्या, त्यावेळी शिवसेना आणि संजय राऊत कुठे होते. त्यांनी उघडपणे यावर भूमिका घेतली नाही, असाही प्रश्न आता विचारला जात आहे.
 
 
 
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलीसांवर टीका केल्यानंतर शिवसेनेने कंगनाबद्दल विरोधात उघड भूमिका घेतली आहे. संजय राऊत म्हणाले, "मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल असे वक्तव्य करणाऱ्यांबद्दल कठोर कारवाई करायला हवी. मी कधीही पोकळ धमकी देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस आहे.", असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तत्काळ याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या सगळ्यात त्यांनी कंगनाचे नाव घेणे टाळले आहे.
 
 
 
करिष्मा भोसले यांनी आपल्या घरासमोरील मशिदीवर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर भोंग्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. तब्बल दोन महिने चाललेल्या त्यांच्या लढाईला सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यश आले होते. दरम्यानच्या काळात करिष्माला मुंबई सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.







@@AUTHORINFO_V1@@