भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन

    19-Sep-2020
Total Views | 94

tarasing_1  H x



मुंबई :
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन झाले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. तारासिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी ८.३० वाजता लीलावती रुग्णालयात निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षातून शोक व्यक्त होत आहे.




“माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.तर,"अनेक वर्षे मुलुंड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते , माजी आमदार सरदार तारासिंह यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. गोरगरिबांबाबत कणव बाळगणारा, सतत सक्रिय असणारा नेता भाजपाने आज गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली !" असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तारासिंह यांना श्रद्धांजली वाहिली. सरदार तारासिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सरदार तारासिंह यांनी मुंबई महापालिकेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. ५ वेळा नगरसेवक आणि ३ वेळा मुलुंडचे आमदार होते.
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121