५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने उघडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2020
Total Views |

Mumbai_1  H x W
मुंबई : मुंबईत ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी, काही ठिकाणे अनलॉकही करण्यात आले आहेत. त्यातील `मिशन बिगिन अगेन` अंतर्गत दुकांच्या वेळातही बदल करण्यात आले आहेत. मॉलमधील काही दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना वेळेच बंधन राहणार आहे. कोरोनाच्या निमित्ताने लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाला प्रतिबंध करण्याचा तो प्रयत्न होता. मात्र त्यानंतर मुंबईचे अर्थचक्र धीमेगती सुरू राहावे म्हणून काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली. त्याचाच पुढचा टप्पा बुधवार ५ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
 
बुधवारपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. करोना आणि लॉकडाऊनमुळे दुकाने उघडण्याची वेळ याआधी कमी कालावधीची तसेच सम-विषम तारखेला किंवा एक दिवस आड करून दुकाने सुरू करण्यास परवानगी होती. मात्र आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईतली रस्त्यांच्या दोन्ही बाजूची सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना आणि नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
 
मद्य विक्रीच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. काऊंटर विक्रीबरोबरच मद्य घरपोचही देता येणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केला तर कारवाई केली जाणार आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानेही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मॉलमधली सिनेमागृह मात्र बंद राहणार आहेत. फूड कोर्ट, रेस्तराँ, हॉटेल्स या सगळ्यांना होम डिलिव्हरीची संमती देण्यात आली आहे. सलून, स्पा, ब्युटी पार्लर्स यांना अटी-शर्तींच्या अधीन राहून संमती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गोल्फ, आऊटडोअर फायरिंग रेंज, ओप न एअर जिम, आऊट डोअर बॅडमिंटन, मल्लखांब यांनाही संमती देण्यात आली आहे. स्विमिंग पूल बंदच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@