निशिकांतच्या बातम्यांवर रितेश देशमुख भडकला!

    17-Aug-2020
Total Views | 310
Nishikant Kamat _1 &
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले नसून त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती अभिनेता रितेश देशमुख याने दिली आहे. सोमवारी दुपारी कामत यांचे निधन झाल्याच्या बातम्या अनेक वृत्तसंस्थांनी दिल्या होत्या. यावर प्रतिक्रीया देत असताना निशिकांतचे निधन झाले नसून तो व्हेंटीलेटरवर आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करा, अशा आशयाचे ट्विट त्याने केले.


तसेच निशिकांतच्या निधनाच्या बातम्या देणाऱ्या वृत्तसंस्थांनाही त्याने धारेवर धरले. निशिकांतच्या मरणाबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांनी उत्तर द्यावे, असा जाब त्याने प्रसिद्धी माध्यमांना विचारला आहे. लिव्हर सोरायसिस या आजाराशी निशिकांत कामत गेल्या काही काळापासून झगडत आहेत. यातून ते बरेही झाले होते, मात्र काही कालावधी नंतर त्यांना पुन्हा हा त्रास सुरु झाला. हा त्रास वाढल्याने त्यांना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभर या आजाराशी झुंज देताना त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. सोमवारी सकाळी त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121