ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी कालवश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |

lildhar kambli_1 &nb



रंगभूमीचा आणखी एक ‘तारा’ निखळला!


मुंबई : मराठी रंगभूमीवरील दिग्दर्शक, ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे ठाणे येथे राहत्या घरी निधन झाले. ते गेले २ वर्ष कॅन्सरशी झुंज देत होते. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते.


‘भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही त्यांनी काम केले. ‘बे दुणे तीन’ ही मालिका खूप लोकप्रिय ठरली.


‘हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे ३० हून अधिक नाटकांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ अशा त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका. मच्छिंद्र कांबळी यांच्याही बरोबर अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली. ‘वस्त्रहरण’, ‘हसवाफसवी’या नाटकांनी त्यांनी त्यांनी परदेश दौरेही गाजवले.
@@AUTHORINFO_V1@@