महाविकास आघाडीच्या खाटेची कुरकुर सुरूच!

    दिनांक  24-Jul-2020 11:22:11
|
Ashok_1  H x W:

ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही; आता काँग्रेसनेते अशोक चव्हाण नाराज!

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी नाट्य काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीय. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचे समजते आहे. संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.


सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने अशोक चव्हाण संतप्त झाले. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असून संबंधित मंत्र्यांनाच गृहत धरत असल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे निर्णय चव्हाण यांना डावलून होत असल्य़ाची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


"ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही," असे म्हणत अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली होती. तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.