हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या चाचणीवरील बंदी WHOने घेतली मागे

    दिनांक  04-Jun-2020 18:19:11
|

WHO_1  H x W: 0


नवी दिल्ली :
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिल्या होत्या. या औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी होतो. यादरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाची चाचणी बंद करण्याची शिफारस WHO ने मागे घेतली आहे.डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस म्हणाले की, बोर्डाने अभ्यास करुन कोरोना मृत्युदरांचा आढावा घेतला आहे. या दरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन चाचणी सुधारित करण्याचे कोणतेही कारण नाही, असे आढळले. त्यामुळे डब्ल्यूएचओने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर सुरु असलेल्या संशोधनात सहभागी संशोधकांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने खबरदारी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली होती. हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतल्याचे त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले होते.


हा विज्ञानाचा मोठा विजय असल्याचे संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ट्विट करत म्हटले आहे. WHO कडून ही शिफारस मागे घेतल्यानंतर सीएसआयआरच्या डॉ शेखर मांडे यांचेही माशेलकर यांनी कौतुक केले आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनने कोरोना बरा होतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे. सुरवातीला काही अडचणी आल्या म्हणून संशोधन थांबवायला नको असे माशेलकर यांचे म्हणणे आहे.भारताने या चाचण्या थांबवण्याचा विरोध केला होता. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालयांमध्ये कन्ट्रोल्ड स्टडी करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये हे औषध कोरोनावरही काम करु शकते आणि त्याचे फार दुष्परिणामही नाहीत. मात्र हे औषध देताना रुग्णाचा ईसीजी तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.