पवई क्वारंटाईन सेंटरमधील जेवणात अळ्या

    03-Jun-2020
Total Views | 96
powai_1  H x W:



मुंबई : पवईतील आयआयटी गेट नंबर २ जवळील हिरानंदानी हिल ग्रीन इमारतीच्या २०व्या मजल्यावरील संतापजनक प्रकार उघडकीस आला. दुपारच्या जेवणात दोन थाळीमध्ये अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिका प्रशासन हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.


पवईतील आयआयटी गेट दोन जवळील हिरानंदानी हिल ग्रीन इमारतीच्या २०व्या मजल्यावर हा संतापजनक प्रकार समोर आला. मात्र, तरीही दुसऱ्याला सांगू नका, दुसरे जेवण दिले जाणार नाही. त्या अळ्या काढून टाका आणि जेवण करा, अशा शब्दांत येथील महिलांना देऊन खडसावले. या बाबत वार्ड ऑफिसर संतोष कुमार धोंडे व वैद्यकीय अधिकारी विलास मोहकर यांना विचारणा करण्यासाठी फोन केले असता त्यांचे मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले.


आज दुपारी १ वाजून १० मिनिटांनी जेवण देण्यात आले. महिलांना भूकही लागलेली होती. अचानक चवळीची भाजी व चपाती घेत जेवण सुरूवात करताच जेवणात मृत अवस्थेत दोन अळी आढळल्याने सर्वांनी जेवण थांबवले. या प्रकारामुळे येथील सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सविस्तर माहिती अशी की, येथील उपस्थितीतांनी जेवणात अळी सापडल्याचे मान्य केले आहे.पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून, सर्व प्रथम सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मोहकर यांची चौकशी करून यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121