गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्र पोलीस दलातील १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

    दिनांक  28-Jun-2020 19:59:25
|

Police_1  H x Wएका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू


मुंबई : गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्र पोलीस दलातील १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या ४६६६ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत ५७ कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे. 


भारतात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विरोधातील लढाईत आपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात राज्यातील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार आदींचा समावेश आहे. यातील अनेकांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.