चांदीचा मास्क !!! किंमत फक्त...

    15-Jun-2020
Total Views | 117
silver mask _1  



रत्नागिरी : कोरोनाबरोबर जगायला शिका, असे संदेश जागतिक आरोग्य संघटना देत असल्यामुळे यापुढे आपल्याला अनेक महिने स्वतःची काळजी घेत कोरोना संक्रमण रोखण्याचे आव्हान आहे. सॅनिटायझरसह आणखी महत्वाचा घटक असेलल्या मास्कचे विविध प्रकार बाजारात येत आहेत. मात्र, एका सुवर्णकाराने चांदीचा मास्क बनवून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

सुरूवातीला मास्कचा तुटवडा होता परंतु आता मास्कची मागणी वाढल्याने मास्कमध्येही विविधता आली. ऑनलाईनवर आता विविध प्रकारचे मास्क मिळत आहेत. स्त्रियांसाठी आता प्रत्येक कपड्यांना साजेसे असलेले मास्कही मिळू लागले आहेत. कोरोनाबरोबर जगायचे असले तरी आता लग्नकार्यात देखील मास्क वापरणे गरजेचे बनणार आहे. लग्नकार्य हे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होणार असले तरी लग्नकार्यासाठी दागिने व कपड्यांची हौस कायमच राहणार आहे. 


आता नव्या दागिन्याची भर पडली आहे आणि ती म्हणजे मास्कची. लग्नकार्यालयात वापरण्यात येणार्‍या भरजरी कपड्यांसह साध्या कापडाचा मास्क वापरणे तसे बरोबर दिसणार नाही. यामुळे आता अनेक सुवर्णकारांनी देखील अनोखी शक्कल लढविली आहे. रत्नागिरीतील एक सुवर्णकार शा जसराज ज्वेलर्स यांनी आता चांदीचा मास्क बनवला आहे. सध्या ६० ग्रॅम वजनाच्या चांदीत हा मास्क बनवण्यात आला असून त्यामुळे आता लग्नकार्यात व समारंभात भारी कपडालत्त्याबरोबरच हा मास्कही शोभून दिसणार आहे.




सध्या रत्नागिरीतील एका ग्राहकाने हा मास्क खरेदी केला असल्याचे सुवर्णकार शहा जसराज ज्वेलर्स यांनी सांगितले. या ग्राहकाने मास्कचा फोटो आणून दिला होता. त्याप्रमाणे या सुवर्णकाराने त्या डिझाईनमध्ये हा चांदीचा मास्क बनवून दिला. या चांदीच्या मास्कला अंदाजे ३९०० रुपये खर्च आला आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121