पवारांचे म्हणणे शंभर टक्के खोटे!

    दिनांक  11-Jun-2020 17:05:36
|
Sharad Pawar _1 &nbs
 
 


अभाविपचा राष्ट्रवादीला टोला

मुंबई : अंतिम विद्यार्थ्यांच्या परिक्षांवरून राजकारण तापले असताना शरद पवार यांनीही याबद्दल मत व्यक्त केले होते. याला आता अभाविपतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. "पवारांचे म्हणणे शंभर टक्के खोटे आहे. शरद पवारजी तुमची माहिती चूकीची आहे, तुम्ही ज्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे नाव घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ज्ञान काढलेत. पण दुर्दैवाने राज्यपलांचे नाही तुमचे ज्ञानच अधूरे ठरत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सरसकट सर्व परीक्षा रद्द केलेल्या नाहीत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरविले असून त्यांनीही ऑनलाइन, ओपन टेक्स्ट बुक सारखे पर्याय निवडले आहेत.", असा टोला अभाविप सचिव अनिकेत ओव्हाळ यांनी पवारांना लगावला आहे.


ते म्हणाले, "आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारणी विद्यार्थ्यांना भ्रमित करीत आहेत हे सिद्ध झाले. तुमच्या पक्षात विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वाटोळे करू नका. आज तुमच्या पक्षाचा वर्धापन दिवस आहे त्यात तुम्ही महाराष्ट्राच्या युवकाना मार्गदर्शन कराल असे वाटले होते पण तुम्हीही तोच अर्धवट ज्ञानाचा कित्ता गिरवलात. माझी माहिती चूकीची असेल तर पवार अचूक माहिती देतील अशी अपेक्षा आहे,"
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.