पण विश्वास तयार नसेल लोकांमध्ये वाढायला तर आपण काय करायचे ?

    दिनांक  20-May-2020 12:40:38
|

NILESH RANE_1  
मुंबई : लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही महत्त्वाच्या विषयावर सूचना केल्या. तसेच, अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये विश्वास निर्माण करा आणि त्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामाला लावा असेदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्या शैलीत यावर खोचक टिप्पणी केली आहे.
 
 
 
 
“साहेब…. आपण लोकांमध्ये विश्वास वाढवायच्या सूचना दिल्या पण विश्वास तयार नसेल लोकांमध्ये वाढायला तर आपण काय करायचे?,” अशी टिप्पणी निलेश राणे यांनी केली आहे. राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यावेळी दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनाने आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील, अशी प्रमुख सूचना पवारांनी केली. याचप्रमाणे अनेक सल्ले त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.