दिग्गज म्हणतात धोनीसाठी पुनरागमन कठीण ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020
Total Views |

MS Dhoni_1  H x
 
मुंबई : सध्या कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. सर क्रिकेटप्रेमींना आयपीएल २०२०चे वेध लागले होते. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे यावरही पाणी फिरले. आयपीएलची स्पर्धा झाली असती तर अनेक दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि गेले काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या महेंद्रसिंग धोनीचे. आता भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी धोनीचे पुनरागमन कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे.
 
माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले की, “३८ वर्षीय धोनी गेल्या वर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अखेरचा सामना खेळला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना अद्याप कोणत्याही सामन्यात धोनीचे दर्शन झालेले नाही. त्यातच आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटचे सामने कधी सुरू होतील, हेच माहिती नसल्याने धोनीसाठी पुढील काळ अधिक खडतर असणार आहे. त्यामुळे धोनीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अत्यंत अवघड जाणार आहे.”
 
पुढे ते म्हणाले की, “धोनीच्या तंदुरुस्तीविषयी मला किंचितही शंका नाही. परंतु एखादा क्रीडापटू चाळिशीकडे मार्गक्रमण करताना आपसूकच त्याच्या शरीराच्या हालचाली मंदावल्या जातात. त्यामुळे धोनीला स्वत:ची तंदुरुस्ती जपण्यासोबतच संघ व्यवस्थापन आणि कर्णधार यांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल. गेल्या १० महिन्यांपासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यातच कोरोनाचे संकट टळल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष ट्वेन्टी-२० विश्वचषकावर असणार आहे. अशामध्ये इतक्या कमी कालावधीत त्याचे संघात पुनरागमन होणे अशक्यच आहे.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@