कोरोना सर्वे करताना मुस्लिम व्यक्तीकडून गैरवागणूक

    दिनांक  20-Apr-2020 22:32:09
|
Nagpur Crime_1  आशा वर्करचा आत्महत्येचा प्रयत्न


नागपूर : कोरोना सर्वेक्षणासाठी मोहल्ल्यामध्ये आलेल्या आशा सेविकेला गुलाम हमीद नामक इसमाने धमकावून अपमानित केल्यामुळे संबंधित महिलेने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा पयत्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, या प्रकारात पोलीसांकडून दुर्लक्ष झाल्याचाही आरोप आता केला जात आहे. आरोपीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे बोलले जात आहे.
'
 
१२ एप्रिल रोजी नागपूरच्या कामगार नगर वस्तीत पीडित आशा सेविका महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत सर्वेक्षणासाठी गेली होती. यावेळी आरोपी गुलाम हमीद याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी हमीद बाहेर आला पीडित महिलेचे ओळखपत्र व सर्वेक्षणाचे कागद फाडून टाकले. या प्रकरणाची पीडितेने पोलीसांत तक्रार केली असता आरोपीने संबंधित आशा सेविका ही घरात शिरल्याचा आरोप केला. घडल्या प्रकारामुळे पीडित महिला तणावाखाली गेली होती.
 
 
सायंकाळी तिच्या नातेवाईकांनी घटनेची चौकशी करण्यासाठी फोन केला असता तिने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कुटूंबियांनी दिली. दरम्यान, आत्महत्येच्या प्रयत्न नंतर पोलीसांना या प्रकरणी जाग आली. कपील नगर पोलीस ठाण्यात आरोपी गुलाम हमीद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वीही तबलिघी लपून बसलेल्या ठिकाणी मध्यप्रदेशमध्ये डॉक्टरांवर हल्ला झाला होता.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.