एनसीबीच्या रडारवर अभिनेता अर्जुन रामपाल ?

    दिनांक  09-Nov-2020 14:09:25
|

Arjun Rampal_1  
 
नवी दिल्ली : अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरी सोमवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला, अशी माहिती देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या प्रियसीच्या भावाला अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता बॉलिवूडमधील ड्रग सिंडिकेट प्रकरणात एनसीबीच्या रडारवर अर्जुन रामपाल असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून बॉलिवूडमधल्या ड्रग्स सिंडिकेटच्या संदर्भात तपास केला जात आहे. यामध्ये बॉलीवूड टीव्ही कलाकारांना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तस्करांना अटक करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली होती.
 
 
तस्कराची चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या संपर्कात क्षितिज प्रसाद आणि अ‌ॅजिसिलाओस हे दोन आरोपी सतत संपर्कात होते अशी कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांना आणखी एका प्रकरणामध्ये अटक दाखवण्यात आलेली आहे. दरम्यान, अर्जुन रामपालच्या घरी मारलेल्या छाप्यादरम्यान अमली पदार्थ मिळाले की नाही याची माहिती अद्याप देण्यात आली नाही. या कारवाई दरम्यान अर्जुन रामपाल घरात उपस्थित नसल्याचे समोर आले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.