‘काळ’ ठरला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |

kaal_1  H x W:



रशियातील ३० शहरांमधील १०० स्क्रीनवर होणार काळप्रदर्शित

मुंबई : काळचित्रपटाने घोषणा झाल्यापासून आणि नंतर प्रदर्शित झालेल्या ट्रेलरच्या माध्यमातून चित्रपट रसिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्कंठा निर्माण केली आहे. या चित्रपटाने रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट असा बहुमान पटकावला आहे. चित्रपट महाराष्ट्रात २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत असून त्यानंतर तो रशियातील ३० शहरांमध्ये १०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चौथ्या बॉलीवूड चित्रपट महोत्सवात काळचा प्रीमियर आयोजित केला जाणार आहे.


काळचा समाजमाध्यमांवरील ट्रेलर पाहून रशियातील कंपनीने आणि चित्रपट महोत्सव आयोजकांनी निर्माते आणि फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना रशियातील प्रदर्शनासाठी विनंती केली. चित्रपटाचा विषय आणि चित्रपटाची हाताळणी याने आयोजक प्रभावित झाले होते. अशा विषयांना रशियामध्ये खूप मोठी मागणी असते. त्यानंतर या चित्रपटाचे रशियातील प्रदर्शन नक्की झाले. आमच्यासाठी ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे की रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आमचा आहे,” असे उद्गार फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर यांनी काढले.


काळचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन डी संदीप यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर तसेच नितिन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

@@AUTHORINFO_V1@@