भाजपच्या मंडल अध्यक्षपदी पंचाक्षरी, काकड बिनविरोध

    दिनांक  01-Jan-2020 19:51:38
|
BJP Nashik _1  
 
 

नाशिक महानगरामध्ये १० मंडल गठितनाशिक : भारतीय जनता पक्षाचे नाशिक महानगर मंडलाचा विस्तार झाला असून शहर जिल्ह्यात पूर्वी सहा मंडले होती. त्यामध्ये विस्तार होऊन नवीन रचनेत १० मंडले गठीत झाली आहेत. या आधी पाच मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दि. ३० डिसेंबर, २०१९ रोजी सायं. ७ वाजता पंचवटीतील गोपाल मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत पंचवटी मंडल व नव्याने स्थापित झालेल्या तपोवन मंडलांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली.

 

यामध्ये पंचवटी मंडल प्रभाग क्र. २, ३ व ५ यांचा समावेश असून एकूण ९९ बुथ समाविष्ट आहेत. या मंडलाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर पंचाक्षरी यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांची फेरनियुक्ती झालेली आहे. तसेच नव्याने स्थापित झालेल्या तपोवन मंडलात प्रभाग क्र. १, ४ व ६ चा समावेश असून एकूण ९३ बुथ समाविष्ट आहेत. या मंडलाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर काकड यांची बिनविरोध निवड झाली आहे. काकड हे रक्तदान, पर्यावरण व व्यसनमुक्ती चळवळीत २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे कार्य करतात. तसेच जनकल्याण रक्तपेढीचे संचालक म्हणून काकड यांनी काम पाहिलेले आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.