तरुणांनी क्रीडा स्पर्धांतून जपावे शरीरधन -सपना परमार

    22-Dec-2018
Total Views | 33

 
 
दोंडाईचा : 
 
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढी कला व क्रीडा या क्षेत्रापासून लांब जात आहेत. अमेरिकेत उद्योग, व्यापार, शिक्षणासोबत कला व क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व आहे, असे मत अमेरिका येथील उद्योजिका सपना परमार यांनी व्यक्त केले.
 
 
दोंडाईचा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने 20 रोजी दादासाहेब रावल स्टेडियम या ठिकाणी क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.
 
 
अध्यक्षस्थानी माजी आ. तथा संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब रावल तर प्रमुख पाहुणे अमेरिका येथील उद्योजिका सपना परमार, संस्थेच्या सचिव शिप्रा रावल, व्यासपीठावर प्राचार्या सुरेखा राजपूत, के. डी. जमादार, ज्योत्स्ना वाणी, अहमद शेख, मुमताज बोहरी, अनिता जयसिंगाणी आदी उपस्थित होते.
 
 
मान्यवरांच्या हस्ते मशाल रोवली व क्रीडा ध्वज फडकावण्यात आला. विद्यार्थांनी मार्च परेडच्या माध्यमातून मानवंदना दिली.
यावेळी विद्यार्थांनी कबड्डी, खो-खो, क्रिकेट, हॉकी, मल्लखांब, फुटबॉल, व्हॉलीबॉल, नाटिका, कविता, सोलो डॉन्स, स्तवन नृत्य, तलवारबाजी, योगा, पिरॅमिड असे विविध कलाविष्कार सादर केले. मान्यवरांच्या हस्ते राज्य व देशपातळीवर विविध खेळात प्रावीण्य मिळविलेल्या स्वामी विवेकानंद स्कूलच्या विद्यार्थांना बक्षीस, स्मृतिचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले.
 
 
यावेळी संस्थेच्या सचिव शिप्रा रावल यांनी खेळाचे महत्त्व, खेळातील करिअर व उत्तम आरोग्यासाठी भारतीय खेळाचे महत्त्व सांगितले.
 
 
कार्यक्रमासाठी मान्यवरांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयेश राजपूत, तिलत पठाण, रियाझ काझी, मोहसीन मिर्झा, ज्योत्स्ना मेहता, झुंजार पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सुरेखा राजपूत यांनी तर सूत्रसंचालन व आभार जयश्री खारकर, काजल दरेडा यांनी केले.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121