पालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठाला धक्का! माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

    09-May-2025   
Total Views | 106
 
 Harshad Prakash Karkar left UBT and joined Shiv Sena
 
मुंबई : (Harshad Prakash Karkar left UBT and joined Shiv Sena) मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनी उबाठाला 'जय महाराष्ट्र' करीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कारकर यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला.
 
हर्षद कारकर यांनी पत्नी दिक्षा कारकरसह शिवसेनेत प्रवेश केला. दिक्षा या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून सध्या महिला आघाडीच्या उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रिय आहेत. मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील टेम्बवलकर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121