सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करू नका : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय सुरक्षा दलासोबत!

    01-May-2025
Total Views | 43
 
Supreme Court on Pahalgam
 
 
नवी दिल्ली:(Supreme Court on Pahalgam) सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली आहे. गुरवार, दि. १ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
 
याचिकाकर्ते जुनैद मोहम्मद, वकील फतेश कुमार साहू आणि विकी कुमार यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी, त्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करावा, प्रदेशाबाहेर शिकणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थांच्या संरक्षणाबाबत न्यायलयाने काही पाऊल उचलावे आणि जम्मू-काश्मीरसारख्या संघर्षग्रस्त भागातील पर्यटन स्थळांसाठी किमान सुरक्षा द्यावी, अशा काही मागण्या होत्या.
 
या याचिकेला उत्तर देताना न्यायमूर्ती सूर्या कांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, "परिस्थितीची संवेदनशीलता असूनही तुम्ही अशी 'बेजबाबदार याचिका' कशी काय दाखल करू शकता?" तसेच याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले आणि सुरक्षा दलांवर अशा याचिकेचा निराशाजनक परिणाम होऊ शकतो हेसुद्धा अधोरेखित केले.
 
न्यायालय म्हणाले की, "देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे की नाही? अशी जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. या संकटाच्या काळात तुम्ही अशा प्रकारे सैन्याचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न करत आहात का? तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कधीपासून तपासात तज्ज्ञ झाले आहेत? आम्ही फक्त वादांवर निर्णय देत असतो. आम्हाला आदेश देण्यास सांगू नका," अशा परखड शब्दात न्यायमूर्ती सूर्या कांत यांनी याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली.
 
न्यायाधीश पुढे म्हणाले की, "ही वेळ याचिका करण्याची नाही तर ही एक महत्त्वाची वेळ आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हातमिळवणी केली. त्या घटनेचा निषेध केला. त्यामुळे आपल्या सैन्याचे मनोबल खचवणारी कोणतीही प्रार्थना किंवा याचिका करू नका. तुम्ही किमान मुद्द्याची संवेदनशीलता पहा."
 
न्यायलयाने अशा शब्दात खडसावल्यानंतर एका याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली आणि त्यांच्या विनंतीनुसार न्यायमूर्ती कांत आणि सिंह यांच्या खंडपीठाने याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. तसेच केंद्रशासित प्रदेशाबाहेर शिकणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली आणि सुरक्षा दलावर प्रश्न चिन्ह करणे तसेच त्यांची न्यायलयीन चौकशी करण्याच्या मागणीचा न्यायलयानी जोरदार समाचार घेतला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर ( वय ६४ वर्ष) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. सुनील खेडकर यांनी पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर प्रचार प्रमुख, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह, मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख या व अशा विविध जबाबदारी सांभाळल्या. शीख संप्रदायाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ते मूळचे मुंबई चे होते. मागील तीस वर्ष पुण्यात..

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग कार्यालयामध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, समादेशक तसेच शिपायांच्या अर्ध्याहून अधिक जागा रिक्त असल्याने मुंबईतील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न तसेच शासकीय योजनांचा बोजवारा उडाल्याने या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121